top of page

About Us

BG.png

|| अध्यक्षांचे मनोगत ||

"शिवमुद्रा ढोल ताशा पथक,पुणे" ची स्थापना २० ऑगस्ट २००५ रोजी झाली. पथकाचे विद्यमान अध्यक्ष व कै. स्वप्नील सोमण यांनी या पथकाची मुहूर्तमेढ रोवली. त्याकाळी १५ ढोल, ३ ताशे आणि १ ध्वजासह लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी सर्वप्रथम पथकाने खजिना विहीर आणि रक्षालेखा सोसायटी या दोन मिरवणुका वाजवत वादनाचा श्रीगणेशा केला. तिथून पारंपारिक वादनाचा सुरू झालेला प्रवास आजही अविरतपणे सुरू आहे. दरवर्षी त्याला मिळणारी सामाजिक उपक्रमांची जोड पथकाचा दैदिप्यमान प्रवास आणखी समृद्ध करणारी आहे. सध्या आमच्याकडे आता २०० पेक्षा अधिक  ढोल, ७० ताशे आणि इतर संबंधित वाद्ये आहेत. त्याला ध्वज पथकाची समर्थ साथ लाभत असल्याने वादन आणि ध्वज या दोन्ही प्रकारात पथकाचे वादक उपस्थितांची मने जिंकल्याशिवाय रहात नाहीत. पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीमध्ये महिला वादकांचेही तितकेच योगदान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पथकातील महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून त्याही पुरुष वादकांच्या खांद्याला खांदा लावून वादन करतात. 

आम्ही २०२३ मध्ये झालेल्या "झी  सिने क्रिटिक्स अवॉर्ड" मध्ये देखील वादन केले. याशिवाय अनेक धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा विषयक उपक्रमांमध्ये आम्ही कायम वादनसेवा देत राहिलो .

 

'गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया'

Shivmudra Pathak Statistics

205

Dhol

70

Tasha

125

Dhawaj

6000+

Members

19

Complete Year

bottom of page